पुणे पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त, 2200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

नशामुक्त पुणे शहर करण्यासाठी पोलिसांनी अमली पदार्थ विव्रेत्या तस्करांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार गुन्हे शाखेने कुरपुंभ एमआयडीसीतील ‘अर्थकेम लॅबोरेटीज’ कंपनीत मोठी कारवाई करून तब्बल 1400 कोटींपेक्षा जास्त किमतीचे 700 किलो मेफेड्रॉन जप्त केले, तर गुन्हे शाखेच्या दुसऱया पथकाने दिल्लीत छापे टाकून 800 कोटी रुपयांचे 400 किलो मेफेड्रोन जप्त केले आहे. याचे धागेदोरे आणखी खोलवर जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अमली पदार्थ तस्करी करणाऱया आंतरराष्ट्रीय तस्करांना गुन्हे शाखेच्या युनिट-1ने तिघांना नुकतीच अटक केली होती. त्यांच्याकडून तीन कोटी 58 लाख रुपयांचे मेफेड्रॉन जप्त केले होते. त्यानंतर पथकाने सोमवारी (19 रोजी) रात्री उशिरा विश्रांतवाडीतील एका गोदामात छापा टाकून 55 किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने कुरपुंभ एमआयडीसीतील केमिकल कंपनीत छापा टाकून तब्बल 700 किलोपेक्षा जास्त एमडी जप्त केले आहे, तर दुसऱया पोलीस पथकाने नवी दिल्लीत छापेमारी करीत तब्बल 800 कोटींचे 400 किलो मेफेड्रॉन जप्त केले.

अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. त्यानुसार तस्करांविरुद्ध ठोस कारवाई केली जात आहे. याप्रकरणी तपासाच्या अनुषंगाने आता देशातील विविध भागांत पथके रवाना केली आहेत. त्याशिवाय राज्याबाहेर कारवाईसाठी पेंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेणार आहे.
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

कंपनी ड्रग्जचा अड्डा
गुन्हे शाखेने कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम लॅबोरेटीज कंपनीत छापा टाकला. तेथून 700 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. दोन दिवसांमध्ये 1100 किलो मेफेड्रॉन जप्त केले. पुणे पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे. कारखाना मालक अनिल साबळे याला पोलिसांनी डोंबिवलीतून ताब्यात घेतले आहे.

आंतरराष्ट्रीय कनेक्शन
मेफेड्रॉन तस्करी प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. नशामुक्त पुणे शहर करण्यासाठी ड्रग्ज तस्करांविरुद्ध पोलिसांकडून धडक मोहीम उघडण्यात आली असून या कारवाईचा अनेकांनी धसका घेतला आहे.