
खासगी प्रवाशी वाहतूक एजंटापासून सावध रहा, असे म्हटल्याचा राग आल्यामुळे चौघांनी एसटी प्रवाशी नियंत्रकाच्या केबिनमध्ये शिरून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 23 ऑक्टोबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात घडली.
किशोर नागटिळक, विशाल राठी, पवार, कुमार निकंब अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नामदेव बाळासाहेब कारले वय 52, रा. कात्रज यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव हे एसटी महामंडळात कार्यरत असून 23 ऑक्टोबरला ते स्वारगेट स्थानकात प्रवाशांना सूचना देत होते. खिसेकापू, पिशव्या उचलणाऱ्यांपासून सावध रहा, खासगी प्रवाशी वाहतूक एजंटापासून सावध रहा, अशा सूचना देत होते. त्याचा राग आल्यामुळे खासगी प्रवाशी वाहतूक करणारे एजंट नागटिळक, राठी, पवार आणि निवंâब यांनी नामदेव यांना दमदाटी केली. त्याशिवाय त्यांना आणि वरिष्ठ अधिकारी जाधव यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करीत आहेत.
































































