कारागृह परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की, कारागृह रक्षकासह पत्नी, मुलाच्या विरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येरवडा कारागृह परिसरात गस्त घालणाNया पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना 9 ऑक्टोबरला घडली आहे. याप्रकरणी कारागृहातील रक्षकासह त्याची पत्नी आणि मुलाfिवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारागृह रक्षक महादेव प्रभू म्हस्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची पत्नी आणि मुलाविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई दयानंद शिवाजी कदम (30) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस शिपाई दयानंद कदम हे 9 ऑक्टोबरला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गस्त घालत होते. त्यावेळी कारागृह परिसरातील प्रेस कॅन्टीनजवळ अंधारात म्हस्के, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा थांबला होता. पोलीस शिपाई कदम आणि सकट यांनी त्यांना हटकले आणि घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर म्हस्के यांची पत्नी आणि मुलाने पोलीस शिपाई कदम आणि सकट यांना शिवीगाळ केली. म्हस्के यांच्या पत्नीने कदम यांना धक्काबुक्की केली.