Video – अरेच्चा! आता बाजारात आली ‘पुष्पा’ साडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जून याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ आहे. या चित्रपटातील गाणी आणि संवाददेखील लोकप्रिय ठरत असून त्यावर अनेक रील्स तयार होत आहेत. लोकांची वाढती क्रेझ पाहता सुरत येथील कापड मार्केटमध्ये चक्क ‘पुष्पा’ साडी तयार करण्यात आली आहे.

या साडीवर ‘पुष्पा’ या चित्रपटातील काही दृश्ये प्रिंट केलेली दिसत आहेत. सुरतमधील चरणजीत क्रिएशन नावाच्या साडीच्या दुकानात ही साडी तयार करण्यात आली असून साडीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. विक्रेत्यांकडून वारंवार होत असलेल्या मागणीमुळे ‘पुष्पा’ साडी उपलब्ध केल्याचे दुकानदाराने सांगितले. राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधून साडीला मोठी मागणी असल्याचेही ते म्हणाले.