दक्षिण आफ्रिकेचा मालिका विजय,क्विंण्टॉन डी कॉकचे दमदार शतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, डरबन

कसोटी मालिकेत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जाणाऱ्या यजमान दक्षिण आफ्रिकेने वन डे मालिकेत झोकात पुनरागमन केले. यष्टिरक्षक सलामी फलंदाज क्विंण्टॉन डी कॉकच्या दमदार 121 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने येथे पार पडलेल्या तिसऱ्या वन डेत श्रीलंकेवर 71 धावांनी डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. क्विंण्टॉन डी कॉकचीच सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 5 बाद 331 धावा तडकावल्या. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे या लढतीची समीकरणे बदलली. श्रीलंकेने 24 षटकांमध्ये 5 बाद 121 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. 24 षटकांमध्ये विजयासाठी श्रीलंकेला 193 धावांची आवश्यकता होती. श्रीलंकेकडून कुशल मेंडिसने सर्वाधिक 41 धावा तडकावल्या. इम्रान ताहीरने 19 धावा दोन फलंदाज बाद केले.