निवडणुकीत आश्वासने द्यायची आणि इतर वेळी जनतेच्या खिशावर दरोडा टाकायचा; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल डिझेलच्या दरात गेल्या दहा दिवसात 8 रुपयांनी वाढ झाली आहे. येत्या काळातही पेट्रोल डिझेलचे दर आणखी वाढणार आहेत. इंधनाच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

”महागाई मॅन मोदींचा पुन्हा एकदा हल्ला. पेट्रोल-डिझेलचे आठवडा आठवड्याला वाढवले जात आहेत. जेणेकरून कुणाला कळू पण नये की त्यांचे खिसे कापले जात आहेत. मी गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक वादळ येण्याबाबत बोलत होतो. पण मोदीजी नेहमीप्रमाणे तेव्हा निवडणुकीत व्यस्त होते – आणि निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेल ८ रुपयांनी महाग केले. आणि, ही दरवाढ अशीच सुरू राहणार. महागाई मॅन मोदींचे एकच काम आहे – निवडणुकीत आश्वासने द्यायची, आणि बाकीच्या वेळी जनतेच्या खिशावर दरोडा टाकायचा.” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.