जेलमधून फरार झालेल्या आरोपीची कर्जतमध्ये हत्या, गुप्तांगावर सपासप वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-goykar

सामना ऑनलाईन । कर्जत (नगर)

पुण्याच्या राजगुरू नगर येथील जेलमधून मागील महिन्यात पळलेला कुख्यात आरोपी राहुल गोयकर याची बुधवारी रात्री हत्या झाली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

कर्जत तालुक्यात खंडाळा येथे राहणाऱ्या राहुल गोयकर याच्यावर शेकडो गुन्हे दाखल होते. त्यात मागील महिन्यात तो जेलमधून फरार झाला होता. बुधवारी रात्री 10 वाजता गावातील जुन्या भांडणावरून काही जणांनी लाकडी दांडक्याने त्याला चोपले. डोके, गळा आणि गुप्तांगावर जबर मारहाण करून तसेच डोके ठेचून हत्या करण्यात आली, अशी माहिती देण्यात येत आहे.

या हत्येप्रकरणी भाऊसाहेब बबन खंडेकर, बबन किसन खंडेकर, हौसराव गोयकर, संतोष गोयकर, राजेंद्र चौधरी, आणि तीन महिलांवर आरोप करण्यात येत आहे.