
रेल्वेने अलीकडेच नवीन एसी 3 टीयर इका@नॉमी कोच तयार केले होते. आता या नव्या एसी 3 टीयर इका@नॉमी कोचचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. मेल-एक्स्प्रेसच्या स्लीपर क्लास बेस फेअरच्या 2.4 पट इतके नव्या एसी 3 टीयर इका@नॉमी कोचचे बेस फेअर असणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. म्हणजेच सामान्य एसी 3 टीयर कोचच्या भाडय़ाच्या 8 टक्के कमी नव्या एसी 3 टीयर इका@नॉमी कोचचे भाडे असणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने एसी 3 टीयर इका@नॉमी कोचची निर्मिती केली आहे. या कोचमध्ये जागेचा पुरेपूर वापर करीत बर्थची संख्या वाढविण्यात आली आहे. कोचची लांबी आणि रुंदी तेवढीच असली तरी आतील जागेत कमी करीत 11 बर्थ वाढविण्यात आल्या आहेत. 72 बर्थऐवजी या नव्या इका@नॉमी कोचमध्ये तेवढय़ाच जागेत 83 बर्थ देण्यात आल्या आहेत. त्यामुळे इका@नॉमी कोचमध्ये सामान्य थर्ड एसीसारखी जागा नसेल, परंतु प्रवाशांना अडचणही होणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
कमी भाडय़ात जादा आराम…
या इका@नॉमी कोचला सुविधा सामान्य थर्ड एसीसारख्या असतील, परंतु भाडे त्याच्यापेक्षा कमी असेल असे रेल्वेने म्हटले आहे. सध्या ज्या गाडय़ा चालविण्यात येत आहेत त्या मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाडय़ांना एक-एक इका@नॉमी कोच लावून त्या चालविण्याची रेल्वेची योजना आहे. नवीन 3 टीयर एसी इका@नॉमीच्या कोचचे बेस फेअर मेल आणि एक्स्प्रेसच्या स्लीपर क्लासच्या बेस फेअरच्या 2.4 पट असेल. तसेच रिझर्व्हेशन फी, सुपरफास्ट सरचार्ज आणि जीएसटी चार्ज 3 टीयर एसी कोचसारखाच असणार आहे. लहान मुलांच्या भाडय़ाचा नियम सध्याच्या 3 टीयर एसी कोचसारखाच असेल. आता नव्या भाडय़ाप्रमाणे सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यास रेल्वेने ‘क्रिस’ला सांगितले आहे.
नव्या एसी 3 टीयर इका@नॉमी कोचचे बेस फेअर
अंतर टप्पा बेस फेअर
1 ते 300 कि.मी. 440 रु.
751ते 760 कि.मी. 912 रु.
1526 ते 1550 कि.मी. 1467 रु.
2851 ते 2900 कि.मी. 2153 रु.

























































