नगर – रूईचोंढा धबधब्याखाली पोहण्यास गेलेला रेल्वे पोलीस गेला वाहून, शोधकार्य सुरू

प्रशासनाने बंदी घातलेल्या मांडओहळ धरण परिसरातील रूईचोंढा धबधब्याजवळून गणेश दहीफळे (बक्कल नंबर 465) हा रेल्वे पोलिस दुपारी चार वाजण्याच्या  सुमारास वाहून गेला. त्याचा शोध सुरू आहे. गणेश याच्यासह इतर तिघे पोलिस तेथे पर्यटनासाठी आले होते.

मांडओहळ धरणाच्या सांडव्याखाली रूईचोंढा हा नैसर्गिक धबधबा असून नगर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी ते आकर्षण ठरले आहे. मांडओहळ धरण भरल्यानंतर हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक तेथे गर्दी करीत आहेत. सध्या कोरोना सदृश्य स्थिती असल्यामुळे पोलिस प्रशासनाने तेथील पर्यटनावर बंदी अणलेली आहे. बेकायदेशीर पर्यटन करणारांविरोधात आतापर्यंत पोलिसांनी कारवाईदेखील केलेली आहे.

पोलिस प्रशासनाने बंदी घातलेली असताना रेल्वे पोलिसांनी मात्र बंदी झुगारून रूईचोंढा परीसरात गुरूवारी दुपारी प्रवेश केला. पोलिस नाईक यु एल काेंंगे (बक्कल नंबर 334), पोलिस  शिपाई ए एम मुठे (बक्कल नंबर 288), पोलिस शिपाई जे एस शेख (बक्कल नंबर 287), पोलिस शिपाई जी ए दहिफळे (बक्कल नंबर 465) हे पोलिस पर्यटनासाठी आले होते. पोेहता येत नसलेल्या गणेश दहिफळे याने पाण्यात प्रवेश केल्यानंतर तो त्यात बुडाला.

पारनेर पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना माहीती समल्यानंतर सहा. पोलिस निरीक्षक प्रमोद गवळी तसेच इतर कर्मचा-यांसह त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे गणेश याचा शोध घेण्यात आला. काही काळानंतर अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. यासंदर्भात तहसिलदार ज्योती देवरे यांच्याशी संपर्क केला असता रूईचोंढा धबधबा पाहण्यासाठी चारही पोलिस तेथे आल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या