
माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात गुरुवारी केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सहा दोषींची सुटका करण्याचे निर्देश 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर 30 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा भोगणाऱ्या नलिनीसह सहा दोषींची तुरुंगातून सुटका करण्यात आली. दरम्यान, हा निर्णय घेताना आपली बाजू न ऐकल्याने पुनर्विचार याचिका दाखल केल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.


























































