पब्लिक नाथाभाऊंच्या मागे

28
eknath-khadse

सामना प्रतिनिधी। रावेर

काँग्रेसमधून आलेल्या विखे- पाटलांना सरकारकडून पायघडय़ा टाकल्या जातात; आणि चाळीस वर्षे ज्याने पक्षासाठी अथक परिश्रम घेतले त्याच्या बाजूने शासनाच्या माध्यमातून कोणी एक शब्द बोलले नाही, याची आपल्याला खंत आहे. अरे कुणी तिकीट देवे की ना देवो ही पब्लिक नाथाभाऊंच्या मागे आहे, असे खडे बोल भाजप नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वकीयांनाच सुनावले. रावेर येथे आयोजित केलेल्या भाजप मेळाव्यात बोलताना एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

हितचिंतक म्हणतात तिथे राहू नका. एवढा अपमान सहन कशाला करता. एवढे असल्यावरही मी म्हणतो भाजपलाच जास्तीत जास्त 40 हजार नव्हे तर 80 हजार मताधिक्याने विजयी करून पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधकांना चपराक द्या, असे खडसे म्हणाले. माझ्या वाढवलेल्या पक्षाच्या झाडाला तोडणे मला आवडत नाही. त्यामुळे अवहेलना वा अपमान झाला असला तरी नाथाभाऊ पक्षासाठी काम करणार आहे. आजपर्यंत पक्ष व जनतेच्या विकासासाठी काम करीत आलो. कार्यकर्ते हीच नाथाभाऊंची ताकद असल्याचे सांगत पक्षात होणाऱया अन्यायाविरोधात बोलत राहणार असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या