
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. मंगळवारी या सवर्ण आरक्षणाचे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. या निर्णयाला विरोधांना निवडणुकीपुरता ‘जुमला’ असल्याचे म्हटले आहे. परंतु संसदेश हे विधेयक मंजूर झाल्याने याचा फायदा मिळण्यासाठी अधिक वाट पाहावी लागणार नाही. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांमध्ये येत असाल तर या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तयार राहा. यासाठी तुम्हाला काही कागदपत्रं तयार ठेवावी लागणार आहे.
कोणती आहेत ही कागदपत्रं?
आधार कार्ड –
सवर्ण आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे आधारकार्ड नसेल तर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सध्या सर्वत्र आधारकार्डाला सरकारी अधिकृत ओळखपत्र म्हणून पाहिले जाते. याद्वारे व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळते, त्यामुळे आधारकार्ड तयार ठेवा.
पॅन कार्ड –
कोणतीही नोकरी मिळण्यासाठी हल्ली पॅन कार्ड आवश्यक आहे. तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर त्वरित त्यासाठी अॅप्लाय करा. कारण सध्या नोकरी किंवा इतर सेवांसाठी पॅनकार्ड अनिवार्य झाले आहे.
उत्पन्नाचा दाखला –
8 लाखांपर्यंत उत्तन्न असणाऱ्यांचा आर्थिक मागासदृष्ट्या सवर्ण आरक्षणात समावेश असल्याने तुमच्या पालकांच्या उत्पन्नाचा दाखला आवश्यक असणार आहे. सध्या अनेक राज्यात उत्पन्नाचा दाखल ऑनलाईनही मिळतो. तसेच तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही यासाठी अॅप्लाय करू शकता.
जमिनीचे कागदपत्र –
ज्या व्यक्तींकडे पाच एकरांपेक्षा कमी शेतजमिन आणि 1000 स्क्वेअर फुटापेक्षा कमी जागेत घर आहे अशांनाही या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. यासाठी रहिवासी दाखला, शेतजमिन आणि जागेची कागदपत्रेही आवश्यक असणार आहे.



























































