कारच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कारने धडक दिल्याने रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे बोरिवली परिसरात घडली. दिनेश तिवारी असे मृताचे नाव आहे. अपघात प्रकरणी कार चालक जिमीत जोशीला बोरिवली पोलिसांनी अटक केली. त्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

दिनेश हा रिक्षा चालक होता. शनिवारी पहाटे दिनेश हा रिक्षाने बोरिवलीच्या गोकुळ शॉपिंग सेंटर जवळ आला होता. भाडय़ाची वाट पाहत उभा असताना भरधाव वेगातील कारने दिनेशला धडक दिली. त्या धडकेत दिनेश हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती समजताच बोरिवली पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी दिनेशला भगवती रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातात प्रकरणी पोलिसांनी जिमीत विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.