टीम इंडियाला दिलासा – रोहित टी-20साठी फिट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाने संक्रमित झालेला टीम इंडियाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा आता कोरोनातून पूर्ण बरा झाला असून क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 7 जुलैपासून हिंदुस्थान आणि इंग्लंड संघांतील तीन टी-20 लढतींच्या मालिकेला सुरुवात होत आहे. रोहित या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी पूर्ण फिट झाला आहे. त्यामुळे हिंदुस्थानी चाहत्यांत आनंदाचे वातावरण आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या बार्ंमगहॅम कसोटीपूर्वी रोहितला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे उपकर्णधार जसप्रीत बुमराहला या कसोटीत हिंदुस्थानचे नेतृत्व करावे लागले.