युद्ध कुणालाच नको! हिंदुस्थान-चीनमध्ये पाच मुद्द्यांवर सहमती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाख सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये रशियाची राजधानी मॉस्कोत चर्चा झाली. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये पाच मुद्यांवर सहमती झाली. तब्बल तीन तास झालेल्या बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली.

शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने मॉस्कोत गेलेले हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात सीमाप्रश्नावर प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेनंतर उभय देशांच्या वतीने संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यात लडाख सीमेवरील परिस्थिती दोन्ही देशांच्या हिताची नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून संवादाच्या माध्यमातूनच यावर तोडगा काढण्यावर एकमत दर्शवण्यात आले आहे.

बैठकीत सहमती झालेले पाच मुद्दे
ह सीमेवरील तणाव दोन्ही देशांच्या हिताचा नाही. दोन्ही देशांच्या लष्करामधील संवाद सुरू राहिला पाहिजे. सीमेवर उचित अंतर राखले पाहिजे.
ह उभय देशांतील संबंध विकसित करण्यासाठी ठरवण्यात आलेल्या सहमतीचे पालन करणे आणि मतभेदाचे रूपांतर वादात न करणे.
– सीमेवर शांतता महत्त्वाची आहे. तणाव वाढवणाNया कारवाईपासून दोन्ही देशांनी दूरच राहिले पाहिजे.
– सीमेवर शांतता प्रस्थापित होताच उभय देशांनी विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुढे पाऊल टाकले पाहिजे.
-सीमा प्रश्नावर विशेष प्रतिनिधीच्या माध्यमातून संवाद व्हावा तसेच उभय देशांनी समन्वयाच्या माध्यमातून तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

चीनने हिंदुस्थानची जमीन बळकावली, हीसुद्धा देवाची करणीच का?
पूर्व लडाखमध्ये सीमा प्रश्नावरून दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्याचा आधार घेत `चीनने हिंदुस्थानची जमीन बळकावली, हीसुद्धा देवाची करणीच का,’ असा सवाल मोदी सरकारला केला आहे.