‘सलमान सोसायटी’चे अभ्यासू कीडा सॉन्ग आउट, उपेंद्र लिमये दिसणार ख़ास भूमिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सलमान सोसायटी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील दुसरे सॉन्ग आज लॉन्च करण्यात आले असून अभ्यासू कीडा असे या गाण्याचे बोल आहेत. उपेंद्र लिमये, विनायक पोतदार आणि नितीन एम यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.

‘सलमान सोसायटी’ चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप, शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत केली आहे. 17 नोव्हेंबर 2023 ला सर्व चित्रपटग्रहात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

दरम्यान, या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. बाल कलाकार पुष्करने या आधी ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘बाजी’, ‘रांजण’, ‘चि .व चि .सौ. का’, ‘फिरकी’ आणि ‘टी. टी. एम. एम’ झोंबीवली चित्रपटात अभिनय केला आहे तर शुभम मोरेने हिंदी चित्रपट ‘रईस’मध्ये बालपणीच्या शाहरुख़ खानची भूमिका बजावली. तसेच ‘हाफ टिकिट’, ‘फास्टर फेणे’ जर्नी सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने ‘हाफ टिकिट’, ‘ताजमहल’ आणि ‘येरे येरे पावसा, माउली’मध्ये भूमिका केल्या आहेत.

या चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये पाहुण्या भूमिकेत आहे. तसेच चित्रपटामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदी कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.