संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बलिदान दिलेल्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना आज सीमाप्रश्न चळवळीचे केंद्र असलेल्या मराठी भाषिक बेळगावात शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रात जाण्यासाठी मराठी भाषिक सीमावासीयांची चौथी पिढी संघर्ष करत असली तरी जोपर्यंत 865 मराठी भाषिक गावे पूर्ववत महाराष्ट्रात जात नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार हुतात्म्यांच्या साक्षीने करण्यात आला.

सम्राट अशोक चौक रामलिंग खिंड गल्ली येथे आज सकाळी शिवसेना हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस, माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, शिवसेना कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर, तालुकाप्रमुख सचिन गोरले, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, ऍड. अमर येळ्ळूरकर, राजकुमार बोकडे, किरण गावडे, नगरसेवक रवी साळुंखे, सुनील देसुरकर, दिलीप बैलूरकर, शिवाजीराव सुंडकर आदी समिती कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.