फेडरेशन ऑफ प्रेस क्लबच्या उपाध्यक्षपदी समर खडस यांची निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरातील प्रेस क्लबच्या वतीने  एकत्र येत फेडरेशन ऑफ प्रेस क्लब या राष्ट्रीय स्तरावरील महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस यांची या फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या महासंघाचे संस्थापक सदस्य म्हणून प्रेस क्लब ऑफ इंडिया, मुंबई प्रेस क्लब, प्रेस क्लब कोलकाता, प्रेस क्लब हैदराबाद, चंदिगड प्रेस क्लब, स्टेट प्रेस क्लब मध्य प्रदेश, गुवाहाटी प्रेस क्लब आणि अगरतळा प्रेस क्लब यांचा समावेश आहे. महासंघाच्या 10 सदस्यीय गव्हार्ंनग काwन्सिलचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रेस क्लब ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष गौतम लाहिरी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.