
सामना प्रतिनिधी । मुंबई
राम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अयोध्या, नागपूर आणि बंगळूरुमध्ये जनाग्रह रॅली काढणार आहे. संघाचे कार्यकर्ते अंबरीश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. राम मंदिराच्या समर्थनासाठी या रॅलीचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
राम मंदिरासाठी संघ २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, नागपूर आणि बंगळूरुत जनाग्रह काढणार आहे. या रॅलीत १० लाख लोक सामील होतील अशी अपेक्षा अंबरीश कुमार यांनी व्यक्त केली. या रॅलीत राम मंदिराची मागणी केली जाईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी राम मंदिर होईल असे वक्त्यव्य दिवाळीत केले होते. सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी वरील याचिका २०१९ पर्यंत पुढे ढकलली आहे, त्यानंतर संघाने या रॅलीचे आयोजन केले आहे हे विशेष.



























































