
हिंदुस्थानची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या लहान बहिणीचा बुधवारी विवाह झाला. अनम मिर्झा आणि मोहम्मद असदुद्दीन यांचा पारंपारिक पद्धतीने विवाह झाला. मोहम्मद असदउद्दीन हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि हैदराबाद क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा आहे. दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन विवाहाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

अनम मिर्झा आणि असद बऱ्याच महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. अनमचा हा दुसरा निकाह असून गेल्याच वर्षी तिने पती अकबर रशीदशी घटस्फोट घेतला. 2016 मध्ये अनम आणि अकबर यांचा निकाह पार पडला होता आणि दोन वर्ष पूर्ण होण्याआधीच ते विभक्त झाले.
अनम असदपेक्षा वयाने तीन वर्षांनी मोठी आहे. या दोघांना अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेले. सानिया मिर्झानेही असदचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये ‘फॅमिली’ (कुटुंब) असं लिहिले होते.

अनम फॅशन डिझाइनर असून तिचे स्वत:चे फॅशन आऊटलेटदेखील आहे. तर वडिलांप्रमाणेच असदला क्रिकेटमध्ये करिअर करायचे असून त्याची गोव्याच्या रणजी टीममध्ये निवड झाली होती.
























































