सानियाचे ‘गुडबाय’ ठरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
भाजप आमदार राजा सिंह यांनी सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अँबेसेडर पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

 

हिंदुस्थानची सुप्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झाने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिने टेनिसचा निरोप घेणार असल्याचे सांगितले आहे. आगामी ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा आपल्या कारकीर्दीतील शेवटची स्पर्धा असेल असे तिने पोस्टमध्ये नमूद केले आहे. 16 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे बिगुल वाजणार आहे. ही स्पर्धा शेवटची स्पर्धा असल्याचे तिने जाहीर केले आहे. याआधी सानियाने 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया दुबई टेनिस स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र आता तिने ऑस्ट्रेलियन ओपननंतर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.