
सामना ऑनलाईन, पाटणा
हरियाणाची प्रसिद्ध नर्तिका आणि गायिका सपना चौधरीच्या कार्यक्रमात तुफान गोंधळ झाला आहे. छठच्या निमित्ताने बेगूसरायमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बरीच गर्दी झाली होती. या सगळ्यांना सपना चौधरीला जवळून पाहायचं होतं. या नादात सगळेजण स्टेजच्या दिशेने धावले. या धावपळीत काही जणांनी एकमेकांना खुर्च्या फेकून मारायला सुरुवात केली. यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
सपना चौधरी स्टेजवर रात्री १२ च्या आसपास पोहोचली. तिने कसाबसा दोन गाण्यांवर नाच केला मात्र त्यानंतर परिस्थिती भयंकर चिघळली ज्यामुळे तिने कार्यक्रम अर्धवट सोडला. आयोजकांनीही कार्यक्रम गुंडाळायला सुरूवात केल्याने लोकं आणखीनच भडकली होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये १३ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.




























































