आता विद्यार्थ्यांमध्ये शेतकऱ्यांविषयी संवेदना निर्माण होईल, शालेय अभ्यासक्रमात कृषिशास्त्राचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शालेय अभ्यासक्रमात पृषिशास्त्र विषयाचा समावेश केल्याबद्दल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. अतिशय उत्तम निर्णय असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतकऱयांच्या प्रश्नाविषयी संवेदना व जागरूकता निर्माण होईल, असे ट्विट त्यांनी केले आहे.

शेतीला गतवैभव आणि प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश केला आहे. शिक्षण आणि कृषी विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार आहे. या निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून कृषिमंत्री दादा भुसे व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे. कृषी विषयात आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने नवीन बदलाची पायाभरणी करणारा हा मोलाचा निर्णय आहे. या विषयाचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश केल्यामुळे नवी पिढी शेतीकडे आकृष्ट होईल. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये शेतीसंबंधी संवेदनशीलता व जागृती निर्माण करील. विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील आव्हाने आणि शेतकऱयांपुढील प्रश्न यासंबंधी शाश्वत उपाय शोधण्याची नवी प्रेरणा मिळेल, असेही नमूद केले आहे.