दुष्काळात राजकारण नको – शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुष्काळी स्थितीमुळे मी अस्वस्थ आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत काही मागण्या केल्या आहेत. अशा परिस्थितीत राजकारण न आणता लोकांना मदत करावी अशी भूमिका राज्य शासनाची आहे. त्याचे मी स्वागत करतो, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी सांगितले.

बारामतीत बोलताना ते म्हणाले, राज्यात यंदा पावसाअभावी स्थिती भयावह झाली आहे. या परिस्थितीत राज्य सरकारचा दृष्टिकोन राजकारण न आणता लोकांना मदत करावी असा आहे, त्याचे मी स्वागत करतो. सरकारला दक्ष राहून लोकांना मदत करावी लागले. उजनीतील एआय प्रकल्पाबाबत मला माहिती नाही, परंतु माहिती घेतल्यावर अधिकाऱयांशी मी याबाबत बोलणार आहे. नक्की हा प्रकल्प काय आहे, याची माहिती मी घेईन.

मंत्री समितीच्या बैठकीत व्हीएसआयचा आणखी एक प्रतिनिधी वाढवावा अशी चर्चा झाली होती. परंतु राज्य सरकारने नेमलेल्या समितीने गरज नाही असे सांगितल्याचे पवार म्हणाले.

भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्याबद्दल ते म्हणाले, स्मित यांनी मोठी रिस्क घेतली. अन्यथा मोठी मनुष्यहानी झाली असती. त्यांच्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. या घटनेमागे कोण आहे, काय आहे याची माहिती केंद्र सरकार घेईल. पण जे घडले ते चिंताजनक आहे. आपले आठवडय़ातले चार दिवस विमानात असतात. त्यामुळे आत काय चालले आहे, याची नोंद जाणकारांनी घेण्याची गरज आहे.