…तर शेतकऱ्यांमधील अस्वस्थता थांबवता येणार नाही; शरद पवारांचा इशारा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदा प्रश्न अजूनही कायम असून कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापारी हे संतापले आहेत. हीच परिस्थिती कायम राहिले तर शेतकऱ्यांमधील अस्वस्थता थांबवता येणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

बारामती येथे एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांना संवाद साधला. पवार म्हणाले की, ‘हे जिरायत भागातील शेतकऱ्याचे पिक आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क अन्यायकारक आहे’. पुढे बोलताना, ‘पियुष गोयल यांच्या सोबतच्या बैठकीत दिल्लीत काहीतरी चांगले घडेल अशी अपेक्षा आहे. मात्र घडले नाही तर शेतकऱ्यांमधील अस्वस्थता थांबवता येणार नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

‘आपल्या देशातून कांदा प्रामुख्याने बांगलादेशला जातो, हा कांदा नाशिक, धुळे, पुणे, नगर व सातारा जिल्ह्यातील काही भागातून कांदा देश परदेशात जातो, हे जिरायत शेतकऱ्याचे पिक आहे. त्यामुळे निर्यातीवर 40 टक्क्यांची करआकारणी चुकीची आहे, ती तातडीनं काढावी अशी आमची मागणी आहे. दिल्लीतील बैठकीत या बाबत काय निर्णय होतो ते पाहावे लागेल’, असंही ते म्हणाले.