
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
मुंबईकर मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूर याची हिंदुस्थानी संघात एण्ट्री झाली आहे. जसप्रीत बुमराह याला दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याच्याऐवजी शार्दुल ठाकूरला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. हिंदुस्थान व इंग्लंड यांच्यामध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका होणार असून १२, १४ व १७ जुलै रोजी हे सामने होणार आहेत.



























































