
श्री मलंग गडावरील मच्छिंद्रनाथांच्या समाधीची शिवसैनिकांनी रविवारी पूजा केली. यावेळी खासदार राजन विचारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सुभाष भोईर, जिल्हाप्रमुख केदार दिघे, जिल्हाप्रमुख विजय साळवी, सचिन चव्हाण , राजेंद्र महाडिक व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.