शिव ठाकरेचे नशीब चमकले, बिग बॉसच्या फिनालेपूर्वी मिळाली मोठी ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बॉस 16’ची महाअंतिम फेरी रविवार, 12 फेबुवारीला होणार आहे. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चौधरी, शालीन भनोट आणि अर्चना गौतम यांच्यात विजेतेपदासाठी स्पर्धा रंगणार आहे. विजेतेपदाचा प्रमुख दावेदार म्हणून शिव ठाकरे याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, फिनालेपूर्वीच शिवला दिग्दर्शक रोहित शेट्टीकडून मोठी ऑफर मिळाली आहे.

रोहित शेट्टीचा ‘खतरों के खिलाडी 13’ हा शो त्याला ऑफर झाल्याची चर्चा आहे. रिपोर्टसनुसार, रोहित शेट्टी यांनी बिग बॉसच्या घरात जाऊन फायनलिस्टला एकापेक्षा एक कठीण टास्क दिले. त्यानंतर रोहित यांनी शिव ठाकरेची निवड केल्याची चर्चा आहे. ‘बिग बॉस 16’च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये रोहित स्पर्धकांची नावे जाहीर करणार आहे. दरम्यान, शिव ठाकरे याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खुद्द बिग बॉस यांनी शिव ठाकरे याचं कौतुक केलं आहे. बिग बॉस तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तू दाखवून दिलं आहेस, असं देखील बिग बॉस म्हणाले. त्यामुळे शिव प्रचंड भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.