
शिवसेना मलबार हिल विधानसभा आणि श्री सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने विभागातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. मंडळाचे विश्वस्त व समन्वयक सिद्धेश माणगावकर यांनी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख संतोष शिंदे, काँग्रेसचे हिरा देवसी, मनसेचे दिनेश पुन्हडे यांच्यासह जयश्री बळीकर, सुजित राणे, सुरेखा उबाळे, यशोदा कोटीयन, संपदा भाटकर, जयश्री लाड, प्रभाकर पाशटे, विजय पवार, सुप्रिया शेडेकर, मीना आंधळे, सागर राणे, अशोक परब, हरी तावडे, संजोग जाधव, विराज परब आदी उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आमदार सुनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कांजूर विभागात ‘जनता दरबार’ भरवून शेकडो रहिवाशांचा समस्या सोडविण्याचे काम तहसीलदार दिलीप रायनवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका श्वेता पावसकर, दिपक सावंत, सिध्दी जाधव, रवी महाडिक, योगेश पेडणेकर, फादर रुडॉल्फ, सुमन म्हसकर, सचिन चोरमुले, तानाजी मोरे, विलास मोरे, दिलीप पेडणेकर, मिलिंद खानविलकर आदी उपस्थित होते.

शिवसेना नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्या नगरसेवक निधीतून कोहिनूर मिल चाळ पंपाऊंड येथील नवीन जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ विधानसभा समन्वयक दत्ता घाटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निरीक्षक हरदीप सिंग लाली, सुरेश काळे, विधानसभा संघटक सुनिता आयरे, उपविभागप्रमुख नितीन पेडणेकर, शाखाप्रमुख समीर दळवी, वंदना मोरे, शाखाधिकारी कल्पेश शहा उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा क्र.12 च्या नगरसेविका सारिका झोरे यांच्या प्रयत्नाने पालिकेच्या माध्यमातून प्रभागात डेंग्यू मलेरिया निवारणासाठी घरोघरी धूरफवारणी व कीटकनाशक फवारणीसाठी यंत्रणा सज्ज करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. यावेळी मागाठाणे विधानसभा निरीक्षक मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत झोरे, मनसे उपाध्यक्ष तानाजी शेलार, अधिकारी अंकुश राऊत, क्रिष्णा पालखंडे, डॉ. अरमान पत्तेकरी, शाखाप्रमुख सचिन मोरे, समन्वयक माधुरी खानविलकर, इतिश्री महाडिक आदी उपस्थित होते.



























































