
शिवसेनेच्या यवतमाळ येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला निष्ठावंत शिवसैनिकांच्या वज्रमुठेची ताकद दिसली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित निष्ठावंत शिवसैनिकांसोबत संवाद साधत, विकासनिधी मिळत नाही म्हणून बोंबा मारणाऱ्या आणि फितुरी करणाऱ्या गद्दार खासदारांचा समाचार घेतला. प्रत्येक मतदाराने आपल्या बहुमूल्य मताशी झालेल्या विश्वासघाताचा जाब विचारलाच पाहिजे, असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
या कार्यकर्ता मेळाव्यास युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, आमदार संजय देरकर, आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.









































































