मनोरंजक व संवेदनशील गोड कौटुंबिक कथा ‘शॉर्ट अँड स्वीट’

‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. पोस्टरनंतर आता चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटाच्या टीझरवरून कळते की, इतक्या वर्षांनी घरी परतलेला संजू त्याच्या बाबांना भेटण्यासाठी उत्सुक असतानाच, त्यांना भेटल्यावर तो नाराज का झाला, कोण आहेत संजूचे बाबा, नेमके काय कारण असेल ज्यामुळे संजूच्या आईने त्याच्यापासून ही गोष्ट लपवली, याची उत्तरे 3 नोव्हेंबरला प्रेक्षकांना मिळतील.

शुभम प्रोडक्शन प्रस्तुत, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वाटसर, रसिका सुनील या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दिग्दर्शक गणेश दिनकर कदम म्हणतात, ‘शॉर्ट अँड स्वीट’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून नावाप्रमाणेच स्वीट अशी ही कथा आहे. चित्रपटाच्या टीझरवरून एपंदर चित्रपटाच्या कथेबद्दल अंदाज आलाच असेल. ताकदीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाची छाप पाडणारे श्रीधर वाटसर व मालिकेतून घराघरांत पोहोचलेले हर्षद अतकरी व रसिका सुनील यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांनी उत्तम कामगिरी केली आहे. याचबरोबर यूटय़ूबर आणि रील विश्वातील तुषार खैर व कॉमेडी किंग ओमकार भोजणे पाहायला मिळतील. मनोरंजनात्मक तसेच संवेदनशील असा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शुभम प्रोडक्शन प्रस्तुत ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश दिनकर कदम यांनी केले आहे. पायल गणेश कदम व विनोद राव हे या चित्रपटाचे निर्माते असून स्वप्नील बारस्कर यांचे लेखन असून राहुल जाधव यांचे छायाचित्रण आहे.