शिवानी वडेट्टीवार यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार आणि काम न केल्याने विदर्भातील युवक काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या युवक कॉँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.