झाशीच्या राणीसारखी लढणार, शिवसेना कधीही सोडणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. पराभव झाला असला तरी यापुढेही झाशीच्या राणीसारखी लढत राहीन, शिवसेना कधीही सोडणार नाही, अशी भावना महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी व्यक्त केली.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत कडवी झुंज देणाऱया शुभांगी पाटील यांनी निकालानंतर शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मला मोलाची साथ दिली. विभागातील पाचही जिह्यातील मतदार बंधु, भगिनींनी माझ्या पारडय़ात 39 हजार 534 मतांचे दान टाकले. मी सर्वांची आभारी आहे. माझे कार्य मी यापुढेही सुरूच ठेवणार आहे, झाशीच्या राणीसारखी लढत राहीन, असे त्या म्हणाल्या.