बुखारींच्या हत्येचा कट पाकिस्तानातच रचला गेला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘रायझिंग कश्मीर’ या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या करणाऱ्या आरोपींची ओळख पटली आहे. बुखारी याच्या हत्येचा कट हा पाकिस्तानात रचण्यात आला होता, तसे पुरावे देखील हिंदुस्थानकडे असल्याची माहिती कश्मीरचे पोलीस महानिरीक्षक एसपी पानी यांनी ही माहिती दिली आहे.

बुखारी यांच्या हत्येचा तपास वेगान करण्यात आला असून पाकिस्तानमध्ये त्यांच्या हत्येचा कट रचला गेला आहे. त्याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. सजाद गुल हा मारेकरी पाकिस्तानातील आहे. तर आझाद अहमद मलिक, मुझफर अहमद भट, नावीद जाट्ट हे लश्कर-ए-तोयबाचे दहशतवादी यांची ओळख पटली आहे, असेही एसपी पानी यांनी सांगितले.

करणाऱ्या पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार तिन्ही मारेकऱ्यांची ओळख पटवण्यात आली असून यातील दोन हल्लेखोर हे दक्षिण कश्मीरमधील दहशतवादी असून तिसरा मारेकरी हा पाकिस्तानी नागरिक असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव अबू हंजाला उर्फ नावेद असून तो ‘लष्कर- ए- तोयबा’चा दहशतवादी आहे. अबू हंजाला हा काही महिन्यांपूर्वी श्रीनगरमधील रुग्णालयातून पळाला होता. त्याला २६ ऑगस्ट २०१४ रोजी अटक झाली होती.

काश्मीरात शांततेसाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची १४ जून रोजी अतिरेक्यांनी गोळ्य़ा घालून हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आज समोर आले होते. तीन दहशतवाद्यांनी बुखारी यांच्यावर अक्षरशः गोळ्य़ांचा वर्षाव केला. त्यांना पंधरा गोळय़ा लागल्या आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.