
पॉप क्वीन अशी ओळख असलेल्या जगप्रसिद्ध गायिका उषा उत्थप यांना यंदा पद्मभूषन सन्मान जाहीर झाला आहे. उषा उत्थुप यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एका नाईट क्लबमध्ये गायिकेचे काम करून केली होती. आज तकच्या साहीत्या आज तक कोलकाता 2024 या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

”मी खूप खूष आहे की मला हा सन्मान मिळाला आहे. मी 54 वर्षांपासून गाणं गात आहे. मी विचारही केला नव्हता की 54 वर्ष निघून जातील. मी खूष आहे की तुम्ही मला एवढं प्रेम दिलं. एक साडीवाली महिला जिने केरळमध्ये लग्न केलं आणि आता कोलकाता येथे राहते. त्यामुळे तुम्ही मला पूर्णपणे भारतीय बोलू शकता”, असे उषा उत्थुप यांनी सांगितले.
पहिली सॅलरी 75 रुपये होती
”माझा आवाज जाड असल्याने मला शाळेतील कार्यक्रमात गाऊ दिले नव्हते. त्यांनी सांगितले होते की तुम्ही गाणं नाही गाऊ शकत. मी एका सामान्य कुटुंबात वाढलेली आहे. माझे वडील मुंबईत पोलीस कमिश्नर होते. तेव्हा मी नाईट क्लबमध्ये गायचे. नाईट क्लबमध्ये त्या काळात अँग्लो इंडियन लोकं यायची. त्यावेळी साडी नेसून नाईट क्लबमध्ये जायचे व गायचे. त्यानंतर हळू हळू मला संधी मिळत गेली. एक वेळ अशी आली की मला चित्रपटसृष्टीत एका गाण्यासाठी 75 रुपये मिळाले. एवढे पैसे घेणारी मी एकटीच गायिका होती’, असे उषाजींनी सांगितले.



























































