भांडण सोडविणाऱ्याचे दगडाने डोके फोडले, सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. येथे भांडण करू नका असे सांगणाऱ्यास शिवीगाळ करून दगडाने डोके फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी सहाजणांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाढवणा पोलीस ठाण्यात या मारहाण प्रकरणी अमोल नागनाथ काळे याने तक्रार दिली. भांडण करू नका, सोडा असे सांगत असताना फिर्यादीस गफार चोंडके व इतर पाचजणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. दगडाने डोके फोडले. या प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गफार शेख हे करीत आहेत.