पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ट्रॅक्टर्ससह वाळूतस्कर फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

फरार आरोपींच्या शोधासाठी फिरणाऱ्या गुन्हे अन्वेषण पथकाला बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकण्यास गेलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दोन ट्रॅक्टर्ससह वाळूतस्कर फरार झाल्याची घटना कोपरगाव येथे घडली. याप्रकरणी संबंधित वाळू तस्करांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी 2 वाजता गुन्हे अन्वेषण पथक पोहेकॉ. मनोहर सिताराम गोसावी, पो. ना. रविंद्र आबासाहेब कर्डिले, संतोष शंकर लोंढे, पो. कॉ. रणजित पोपट जाधव, यांचे पथक फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी कुंभारी शिवारात आले असता पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कुंभारी शिवारात नदीपात्रात युवराज गायकवाड आणि रविराज भारती हे दोघे त्यांचेकडील एक स्वराज 735 व दुसरे महिंद्रा कंपनीचा 575 लाल रंगाचा असे दोन ट्रॅक्टर त्यांचे ट्रॉलीमध्ये भरत आहेत. ही माहिती कोपरगाव तालुका पो.स्टे चे पो हे कॉ सतिष भताने यांना दिली. त्यांना दोन पंचांना बरोबर घेऊन घेण्यास सांगितले, त्यानुसार ते कुंभारी कमान येथे हजर झाले त्यानंतर छापा टाकण्यासाठी गोदावरी नदीपात्रात पायी चालत गेले. वाळूतस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधास न जुमानता ते नदीपात्रातून डांबरी रोडने कुंभारी गावाकडे पळून गेले. ट्रॅक्टर रविराज जगन्नाथ भारती याचे असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर पो.हे कॉ मनोहर सिताराम गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पो.हे कॉ दत्तात्रय गव्हाणे यांनी युवराज गायकवाड रविराज भारती या वाळूतस्करांवर 4 लाखाचा गुन्हा दाखल केला आहे.