उजनीचा उजवा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाहून गेले..शेतांना तळ्याचे स्वरूप, पिकांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सोलापूर जिह्यात भीषण पाणीटंचाई असताना ऐन उन्हाळ्यात अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे उजनी धरणाचा उजवा कालवा फुटला असून, लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे.  या पाण्यामुळे शेतांना तळ्यांचे स्वरूप आले असून, पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱयांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

माळशिरस तालुक्यातील संगम येथे उजनीचा उजवा कालवा फुटला आहे. गेल्या 20 तासांपासून फुटलेल्या या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाहून गेले असून, आजूबाजूच्या परिसरात व शेतात या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले आहे. उजनीच्या या उजव्या कालव्यातून माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यांतील शेतीला व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. गेल्या 20 तासांपासून फुटलेल्या कालव्याकडे पाटबंधरे विभागाच्या अधिकाऱयांचे लक्ष नाही. या परिसरातील नागरिक व शेतकऱयांनी वेळोवेळी या कालव्याच्या दुरुस्तीकरणासंबंधी मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे.

या फुटलेल्या कालव्याचा सर्वाधिक फटका माळशिरस, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांतील पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या पाणी योजनांवर झाला आहे. एकीकडे पाण्याविना पिके होरपळत आहेत, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाया जात असलेल्या लाखो लिटर पाण्याला संबंधित अधिकारी जबाबदार असून, कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी गणेश इंगळे यांनी केली आहे. यापूर्वी कालवाफुटीचे घटना घडल्या असून, यातून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.