
महानगरपालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर मार्ग येथे 1500 मिलिमीटर व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम बुधवार, 22 एप्रिल रोजी सकाळी 10 पासून 23 एप्रिल रोजी पहाटे 4 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या विभाग ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा 18 तास बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील 4 ते 5 दिवस पाणी उकळून – गाळून प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



























































