विशेष ऑलिम्पिक स्पर्धा; सबिता यादवचा डबल धमाका

42

सामना ऑनलाईन । अबुधाबी

गोव्याची महिला टेबल टेनिसपटू सबिता यादक हिने विशेष (दिव्यांग) ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानला दोन पदके जिंकून दिली. तिने एकेरी टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले, तर दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. वडिलांचे छत्र हरपलेल्या सबिताला आईने दुसऱ्यांची घरकामे करून वाढविले. विशेष ऑलिम्पिकची संधी मिळताच सबितानेही प्रतिकूल परिस्थितीतही संधीचे सोने करत हिंदुस्थानला दोन पदके जिंकून दिली.

17 वर्षीय सबिताला बौद्धिक अपंगत्वाबरोबरच व्यवस्थित बोलताही येत नाही. सबिताच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून तिची आई इतरांच्या घरी धुणीभांडी, घरकाम, साफसफाई करणे अशी कामे करते. पतीच्या निधनानंतरही तिच्या आईने न खचता सबिताला आधार दिला आणि इतरांच्या घरी कामे करून तिला सक्षम बनवले. आर्थिकदृष्टय़ा कमकुकत असलेल्या आपल्या कुटुंबासाठी सबिताला काहीतरी करून दाखवायचे होते. विशेष ऑलिम्पिकची संधी मिळताच सबिताने त्या संधीचे सोने करत हिंदुस्थानचा झेंडा अभिमानाने फडकवला. या स्पर्धेत अव्वल स्थानावर असलेल्या हिंदुस्थानच्या नावावर 163 पदके आहेत. यात 44 सुवर्ण, 52 रौप्य आणि 67 कास्यपदकांचा समावेश आहे, तर चीन दुसऱ्या क्रमांकाकर आहे.

17 वर्षीय सबिता एका विशेष विद्यालयात शिकते. या शाळेत विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. तेथे मुलांना शिवणकाम आणि पाककला आदी गोष्टी शिकवल्या जातात.

आपली प्रतिक्रिया द्या