
>> सुचित्रा दिवाकर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्हाइट हाऊस ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसीच्या (ओएसटीपी) संचालक म्हणून त्यांच्या मुख्य विज्ञान सल्लागार आरती प्रभाकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांचा अभियांत्रिकीतील अनुभव संरक्षण आणि विज्ञान क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तसेच ती आव्हाने हाताळण्यासाठी साह्यभूत ठरेल, असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्हाइट हाऊस ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसीच्या (ओएसटीपी) संचालक म्हणून त्यांच्या मुख्य विज्ञान सल्लागार आरती प्रभाकर यांची नियुक्ती केली आहे. 2 फेब्रुवारी 1959 रोजी जन्मलेल्या आरती यांचे कुटुंब ज्यावेळी दिल्लीहून अमेरिकेला गेले, तेव्हा त्या केवळ तीन वर्षांच्या होत्या. शिकागोमध्ये सामाजिक कार्य या विषयात पदवी घेण्यासाठी त्यांची आई आपल्या चिमुकलीसह सातासमुद्रापार गेली होती. आरती प्रभाकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण लुबक, टेक्सास येथे घेतले. त्यांच्या आईचा त्यांच्यावर खूपच प्रभाव होता. आईने त्यांना लहानपणापासूनच भरपूर वाचन करण्यास प्रोत्साहित केले. या प्रोत्साहनाचा परिणाम असा झाला की, वयाच्या 25व्या वर्षी आरती यांनी अप्लाईड सायन्ससारख्या गूढ विषयावर प्रभुत्व संपादन केले. आरती प्रभाकर यांच्या उच्च शिक्षणाविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी 1979 मध्ये टेक्सास टेक युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विषयात विज्ञान शाखेची पदवी संपादन केली.
त्यांनी 1980 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये मास्टर ऑफ सायन्स आणि 1984 मध्ये पॅलिपहर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अप्लाईड फिजिक्समध्ये पीएच.डी. संपादन केली. या प्रतिष्ठsच्या संस्थेतून अप्लाईड फिजिक्समध्ये पीएच.डी. मिळविणाऱया त्या पहिल्या महिला ठरल्या. पीएच.डी. केल्यानंतर आरती प्रभाकर 1984 ते 1986 पर्यंत टेक्नॉलॉजी अॅप्रेझल ऑफिसमध्ये काम करत काँग्रेसनल फेलोशिपवर वॉशिंग्टनला गेल्या. 1986 पासून त्यांनी डीएआरपीएमध्ये प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि सात वर्षे त्या संस्थेत कार्यरत राहिल्या; परंतु 1993 मध्ये त्यांनी जेव्हा संस्था सोडली तेव्हा त्या मायक्रोइलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी कार्यालयाच्या संस्थापक संचालिका बनल्या. वयाच्या 34 व्या वर्षी प्रभाकर यांची राष्ट्रीय मानक आणि तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयएसटी) प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1993 ते 1997 या काळात त्यांनी हे पद भुषविले.
1997 ते 1998 या काळात त्या रेचेमच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि वरिष्ठ उपाध्यक्ष होत्या आणि त्यानंतर 2000 पर्यंत इंटर्व्हल रिसर्चच्या अध्यक्ष होत्या. हरित तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानविषयक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्याकडे त्यांचे लक्ष होते. 2001 मध्ये यासाठी चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी यूएस व्हेंचर पार्टनर्समध्ये त्या सामील झाल्या. 30 जुलै 2012 रोजी या महत्त्वाकांक्षी पदावर सुमारे दहा वर्षांनंतर रेजिना ई. दुगन यांच्या जागी त्यांची डीएआरपीएच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. 2017-18 मध्ये प्रभाकर या स्टॅनपर्ह्ड येथील सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्टडी इन द बिहेवियरल सायन्सेसमध्ये (सीएएसबीएस) फेलो होत्या. 2019 मध्ये त्यांनी समाजाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचा नवीन मार्ग सोधण्यासाठी एक स्वयंसेवी संस्था सुरू केली. समाजाकडून जेवढे घ्यावे तेवढेच परत देण्याच्या तत्त्वावर विश्वास असणाऱया आरती प्रभाकरन यांचा अभियांत्रिकीतील अनुभव संरक्षण आणि विज्ञान क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तसेच ती आव्हाने हाताळण्यासाठी साह्यभूत ठरेल, असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.





























































