
पाकिस्तानातील पेशावर शहरात पोलीस लाइन्समध्ये बांधलेल्या मशिदीत दुपारी आत्मघाती हल्ला करण्यात आला. नमाज पढणाऱयांमध्ये मधल्या रांगेत हा आत्मघाती हल्लेखोर लपून बसला होता. लोक जमल्यावर स्पह्टकाने त्याने स्वतःला उडवून दिले. या आत्मघाती हल्ल्यात आतापर्यंत 32 पोलीस ठार झाले असून 158 जण जखमी झाले आहेत. यात 90 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
पेशावरमधील पोलीस लाईन्सजवळ असलेल्या या मशिदीत पोलीस लाईन्स असून बाजूला पाकिस्तानी लष्कराच्या तुकडीचे कार्यालयही आहे. आत्मघाती हल्लेखोराने वापरलेली स्फोटके इतकी शक्तिशाली होती की, त्याचा आवाज दोन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्पह्टानंतर मशिदीचा मधला भाग पूर्णपणे कोसळला आणि मशीद धूळ व धुराने भरून गेली होती. मशिदीच्या ढिगाऱयाखाली अनेक जण अडकल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. जखमींवर पेशावरच्या लेडी हार्ंडज रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वसामान्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, असा दावा पाकिस्तानी मीडियाने केला आहे. या दहशतवादी संघटनेने दहशतवादी हल्ल्याची धमकीही दिली होती. याआधी 23 डिसेंबर 2022 रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यात एक पोलीस शहीद झाला होता तर 10 जण जखमी झाले होते.
























































