सामना ऑनलाईन, नाशिक
नाशिकजवळ लष्कराचे लढाऊ सुखोई विमान कोसळल्याचे वृत्त आहे. विमान कोसळण्यापूर्वी त्यात असलेल्या तिघांना पॅराशूटच्या सहाय्याने जीव वाचवल्याचं सांगण्यात येत आहे.
शिरवाडे-वणी फाट्याजवळ वावी ठुशी गावातील एका शिवारात कोसळल्याचं कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही मात्र हे विमान पूर्णपणे जळून खाक झालं आहे.



























































