
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत ब्लॉक असेल. सीएसएमटीहून डाऊन दिशेला धिम्या मार्गाने जाणाऱया लोकल सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 वाजताच्या दरम्यान सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गाने वळवल्या जातील. तसेच या गाडय़ांना भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबा दिला जाईल. त्यानंतर पुन्हा त्या डाऊन धिम्या मार्गाने धावतील. घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धिम्या लोकल सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 वा.पर्यंत विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गाने वळवण्यात येतील. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान डाऊन आणि अप मार्गावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान ब्लॉक राहणार आहे. काही अंतराने पनवेलसाठी कुर्ला स्थानकातून फलाट क्र. 8 वरून स्पेशल ट्रेन सोडली जाईल.





























































