बोइंग स्टारलायनर या अंतराळयानाच्या चाचणीसाठी गेलेल्या नासामधील हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर हे अडीच महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर पृथ्वीवर कधी येणार, याबाबत आता नासाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, बोइंग स्टारलायनर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना न घेताच पृथ्वीवर परतणार आहे. दोन्ही अंतराळवीरांना आता पुढील वर्षी फेब्रुवारीत एलॉन मस्क यांच्या कंपनीच्या ‘स्पेस एक्स’च्या क्रू ड्रगन कॅप्सूलमधून पृथ्वीवर परत आणले जाईल. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी एक्सवर म्हटलेय, नासा आणि बोइंग कर्मचाऱ्यांचे आभार मानतो की, त्यांनी स्टारलायनरच्या समस्यांवर खोलवर जाऊन काम केले.