
अभिनेत्री सनी लिओनी ही नुकतीच दक्षिण आशियाच्या रेड कार्पेट आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. या फेस्टिव्हलमध्ये सनीच्या केनेडी हा चित्रपट या फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रिमियर करण्यात आला. या प्रिमियरच्या वेळी सनी पिवळ्या रंगाच्या स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसली.

“केनेडी” या चित्रपटात सनीने चार्ली नावाच्या महिलेची भूमिका निभावली असून तिचे जगभरातून कौतुक होत आहे.

स्टायलिश यल्लो गाऊनसोबत सनीने हलका मेकअप, फक्त कानातले आणि अंगठी असा मिनिमम लूक ठेवला होता. स्टायलिस्ट चांदनी मेहताने तिचा हा लूक स्टाईल केला होता.

रेड कार्पेटवर सनीने पुन्हा एकदा आपल्या मोहक रूपाने सर्वांना इम्प्रेस केले आहे.

सनी “कोटेशन गँग,” या तिच्या आगामी चित्रपटाने तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.




























































