एका लग्नाचं व्हर्च्युअल रिसेप्शन! तामीळनाडूतील जोडप्याची भन्नाट शक्कल

‘मेटावर्स’च्या आभासी दुनियेत नुकतेच तामीळनाडूमधील एका जोडप्याचे अनोखे रिसेप्शन पार पडले आहे. दिनेश एसपी आणि जनगनंदिनी रामास्वामी असे या जोडप्याने नाव आहे. दिनेश हा आयटी क्षेत्रात काम करतो तर जनगनंदिनी ही सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. मेटावर्समध्ये त्यांनी आयोजित केलेल्या या अनोख्या रिसेप्शनची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. दोघेही हॅरी पॉटरचे फॅन असल्याने याच थीमची त्यांनी निवड केली होती. नवरीच्या दिवंगत बाबांनीदेखील थ्रीडी अवतारात रिसेप्शनमध्ये हजेरी लावत नवदांपत्याला नवीन आयुष्यासाठी शुभाशीर्वाद दिले. जगभरातील तब्बल सहा हजार लोक या रिसेप्शनला उपस्थित होते. याबाबत दिनेश म्हणाला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न आणि रिसेप्शन सोहळ्यात पाहुण्यांच्या उपस्थितीवर अनेक बंधने होती. यातून मार्ग काढत आम्ही मेटावर्सवर रिसेप्शन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरापासून मी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर काम करीत आहे.