सोलापुरात मिळकतकर थकविणाऱ्या तीन महाविद्यालयांना ठोकले सील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर महापालिका करसंकलन विभागाने थकीत करवसुली मोहीम सुरू करत गुरुवारी तीन महाविद्यालयांना सील ठोकले. यात वेगाव येथील सिंहगड कॉलेज, बाळे येथील श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण मंडळाचे कार्यालय आणि भारतरत्न इंदिरा गांधी इंजिनीअरिंग कॉलेज सील करण्यात आले. याशिवाय 12 थकबाकीदारांकडून 1.21 कोटी रुपये वसुली करण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली.

करवसुलीसाठी महापालिकेने पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. पाचजणांच्या पथकांनी 54 लाख रुपयांची वसुली केली. विशेष पथकाने शिक्षण संस्था आणि इतरांकडून मिळून 1 कोटी 21 लाख 35 हजार 863 रुपये वसूल केले.

सोनाशंकर ज्ञान विकास ट्रस्टकडून 45 लाख, भोगल्या स्वामी, जवळेकर, ओम डेक्हलपर्स 11.37, यशोधरा हॉस्पिटल 20.28, भद्रावती यंत्रमाग संस्था 3.89 लाख, सत्य विजय मंगल कार्यालय 9.35, बी. एस. कामानी 4.53, आर. डी. सारडा 4.43, डी. एस. जाधव 2.29, पुलगम टेक्स्टाइल 1.12, मागल्या स्वामी 11.89, महाराष्ट्र सॉ मील 3.13, कृष्णा स्टोन 4.2 लाख असे एकूण 1.21 कोटी कसूल झाले.