लातुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचे धरणे आंदोलन

सामना प्रतिनिधी । लातूर

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी लातूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या (जुक्टा) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

मूल्यांकन प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयाची यादी अनुदानासह घोषित करावी, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, 2 मे 2012 नंतरच्या नियुक्त कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता देऊन त्यांचे शालार्थ पूर्ण करून वेतन द्यावे, सर्वांना वरिष्ठ व निवड श्रेणी सरसकट द्यावी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे, यासह सुमारे 34 मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये प्राध्यापक विलास जाधव, संजय भंडारे, मारुती सूर्यवंशी, शिवराज सूर्यवंशी रामलिंग बिडवे, बाळासाहेब बचाटे, सतीश उगीले, चंद्रकांत पाटील, संतोष उडगे, राजेश्वर धानुरे, जयप्रकाश शेगावकर, दीपक रणदिवे, झबेरखान पठाण, संतोषकुमार मुळे, लहुकांत शेवाळे, राजसाहेब खाडप, दत्तात्रय पवार यांच्यासह इतरांनी सहभाग नोंदवला.

आपली प्रतिक्रिया द्या