‘ठाकरे’ चित्रपटाचा ‘फस्ट डे फस्ट शो’ शिवसैनिकांसाठी मोफत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। बुलढाणा

माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या सौजन्याने ‘ठाकरे’ चित्रपटाचा ‘फस्ट डे फस्ट शो’ शिवसैनिकांसाठी मोफत दाखविण्यात येणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटावर आधारित असलेला व संपूर्ण देशभरात येत्या 25 तारखेला प्रदर्शित होत असलेला ‘ठाकरे’ चित्रपट बघण्यासाठी शिवसैनिकांसोबत अनेक मान्यवर रसिक आस लावून बसले आहे. हा चित्रपट शिवसैनिकाना मोफत बघता यावा यासाठी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आपल्या कार्यकर्ते व शिवसैनिकांसाठी रिलीज होत असलेल्या चित्रपटाचा बुलढाणा शहरातील एआरडी मल्टीप्लेक्स या सिनेमागृहातील ‘फस्ट डे फस्ट शो’ बुक केला आहे.

25 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 3 चा ठाकरे चित्रपट मोफत पाहण्यासाठी शिवसैनिक तथा कार्यकर्ते यांनी ठिक सकाळी 11.30 वाजता सिनेमागृहावर उपस्थित राहावे. तसेच चित्रपटाच्या प्रवेशपास साठी लोकनेते विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय ‘शिवालय’ येथे संपर्क करावा असे आवाहन लोकनेते विजयराज शिंदे यांनी केले आहे.